crime case in kolhapur bridal dead in peth vadgaon 
कोल्हापूर

नातेवाईक रेश्माला भेटण्यासाठी म्हणून आले आणि बातमी ऐकून बसला त्यांना धक्का

सकाळ वृत्तसेवा

पेठवडगाव (कोल्हापूर) : येथील विवाहितेचा काल सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. रेश्‍मा सागर चांदणे (वय २३) असे तिचे नाव आहे. पतीसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माहेरच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मारला होता.

मंगरायाचीवाडी येथील रेश्‍मा यांचा विवाह सागर चंद्रकांत चांदणे (मूळ गाव टोप, सध्या पेठवडगाव) याच्याबरोबर झाला. तो सेंट्रिंग व मजुरीचे काम करत होता. तो दारू पिऊन रेश्‍माला मारहाण करत होता. मेहुण्याच्या लग्नात मानपान केला नाही म्हणून पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता.

शुक्रवारी रेश्‍मा इचलकरंजीला नातेवाइकासोबत गेली होती. यावरून दोघांत वाद झाला. वादाबाबत रेश्‍माने आईला माहिती दिली. त्यानंतर तिचे नातेवाईक प्रवीण पाटोळे भेटण्यासाठी आला. या वेळी तिचा मृत्यू झाल्याचे समजले. यावेळी पोलिसांसह नातेवाईक रेश्‍माच्या घरी गेले. घरात संशयास्पद मृतदेह पडून होता. पोलिसांनी मृतदेह नवे पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांनी शारीरिक व मानसिक छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करावा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. रेश्‍माच्या मागे मुलगा, मुलगी, पती असा परिवार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT