

Sharad Pawar Faction Maharashtra Political News
esakal
Sharad Pawar NCP MPs : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीतील मतभेद समोर येत आहेत. एनडीएला या विधेयकासाठी पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर शरद पवार गटाकडून राहुल गांधी यांच्यापासून अंतर राखल्याचे दिसत आहे. दिल्लीत आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला शरद पवार गटाचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरे यांच्या अनुपस्थितीमुळे पवार गटाची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे.