crime case in kolhapur jaysingpur three people arrested by police in kolhapur 
कोल्हापूर

तलवारीने केक कापणे चांगलेच पडले महागात ; आता भोगताहेत जेलची हवा

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : येथील राहूल रामकृष्ण कांबळे व राहुल अरुण पवार या दोघांनी बेकायदेशीर शस्त्रे बाळगून समाजात दहशत माजवून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करत सर्वसामान्य लोकांना दादागिरी करून त्यांचेकडून पैसे उकळविणे व यासह विविध दहशती निर्माण केल्याने जयसिंगपूर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

राहूल रामकृष्ण कांबळे, राहुल अरुण पवार, फकीरचंद साबू पाथरवट व इतर १४ ते १५ साथीदारांनी सोमवारी रात्री एकत्र येउन ५२ झोपडपट्टी परिसरात वाढदिवस साजरा करत असताना, त्यांनी बेकायदेशीरपणे तलवार स्व:ताचे कब्जात बाळगून त्या तलवारीने वाढदिवसाचा केक कापला. तसेच त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करुन जनतेमध्ये त्यांची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यांचेकडे शस्त्रे आहेत, हे सर्वसामान्य जनतेला समजावे याकरिता त्यांचे वाढदिवसाचे वेळी तलवारीने केक कापून स्वत:चे वाढदिवस साजरे करून दहशत निर्माण केल्याप्रश्नी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. रामकृष्ण कांबळे, राहुल अरुण पवार, फकीरचंद साबू पाथरवट यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT