crime case in kolhapur two employees arrested by police 
कोल्हापूर

कोल्हापुरात दोन महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा; पोलिस उपाधीक्षकांची कारवाई

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : कसबा बावडा येथील शंभर फुटी रोडवर दारू पिणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली. यातील दोघे महामार्ग पोलिस कर्मचारी आहेत. उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बळवंत शामराव पाटील, राजकुमार शंकर साळुंखे आणि जितेंद्र अशोक देसाई यांच्यावर कारवाई करण्यात आली.
     
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरांमध्ये काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण हे कसबा बावडा येथून निघाले होते. त्यांना शंभर फुटी रस्ता येथे तिघेजण दारू पिताना दिसले. चव्हाण यांच्या सोबत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिघांना हटकले प्राथमिक चौकशी केल्यानंतर बळवंत पाटील व राजकुमार साळुंखे हे महामार्ग पोलिस कर्मचारी असल्याचे समजले. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. रविवारी त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली.

धक्काबुक्कीची चर्चा

या तिघांनी उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांना धक्काबुक्की केल्याची चर्चा होती. याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, दारू पिणाऱ्या तिघांची प्राथमिक चौकशी करून त्यांना आम्ही जीप मध्ये बसवले. त्यावेळी त्यांनी विरोध केला. मात्र कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की कोणालाही केलेली नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT