कोल्हापूर

माणगाववाडीत बेकायदेशीर दारू अड्यावर पोलिसांची धडक कारवाई

कोल्हापूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकत कारवाई केली

अतुल मंडपे

हातकणंगले : गावठी दारुनिर्मितीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथील बेकायदेशीर दारू अड्यावर आज कोल्हापूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकत कारवाई केली.

यावेळी ४ लाख३८ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. यामध्ये १५४८० लिटर कच्चे रसायन, ७९५ लिटर तयार दारू ९९ लोखंडी व प्लॅस्टीकचे बॅरेल, गोणपाट आदिंचा समावेश आहे. या प्रकरणी अमर अशोक खोत, बापू गणपती खोत, बाळासो सखाराम खोत, तुकाराम व काकासाहेब कल्लु खोत आणि दोन अज्ञात सर्व (रा. माणगाववाडी) अशा सात संशयिताच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु सर्व आरोपी फरार असून यापैकी एकही संशयीत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

दरम्यान अवैध मद्यनिर्मीती, त्याची विक्री व वाहतूक करताना कोणी आढळयास संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. माणगांववाडी येथील बेकायदेशीर दारू निर्मितीचे अड्डे पाश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकांत प्रसिद्ध आहेत. आजवर अनेकवेळा कारवाई होऊनही परत हे अड्डे नव्या जोमाने सुरू होतात. तर आरोपी नेहमीच पसार होतात. सध्या लॉकडाऊनमध्ये ही राजरोसपणे हे अड्डे सुरूच होते.

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क (मुंबई) चे आयुक्त कांतीलाल उमाप, अम्मल बजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय आयुकत वाय . एम. पोवार, इचलकरंजी विभागाच्या डीवायएसपी श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी उपाधिक्षक पी.आर. पाटील, निरीक्षक, एस.एस. बर्गे, निरीक्षक मिलींद गरुड, अंकुश मते, आर.के. गुरव, अभिनंदन कांबळे, अतुल पाटील, प्रकाश पाटील, बी. एल. पाटील, गणेश गुरव, दत्तात्रय लाडके, अजय वाघमारे, वर्षा पाटील यांच्यासह हातकणंगले पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सिमा बडे यांनी आजमाणगांववाडीतील दारू अड्डयावर छापा टाकला व सुमारे साडेचार लाखाचा मुद्देमाल नष्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT