जुन्या वादातून हाणामारी.jpg 
कोल्हापूर

किरकोळ वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; इचलकरंजीतील घटना

या हाणामारीच्या घटनेने दहशतीचे वातावरण बनले होते

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : लहान मुलांच्या किरकोळ वादातून दोन कुटुंबात (family disputes) तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्राने कुटुंबातील सदस्यांमध्ये मारहाण झाली. या घटनेत दोन्ही कुटुंबातील ८ जण गंभीर (8 people injured) जखमी झाले असून एकाला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जुना चंदूर रोडवरील बरगे मळा परिसरात ही घटना घडली. (ichalkaranji crimenews) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानकपणे सुरू झालेल्या या हाणामारीच्या घटनेने दहशतीचे वातावरण बनले होते. त्वरीत शिवाजीनगर पोलिसांनी (shivajinagar police) धाव घेतली.

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बरगे मळ्यात लहान मुले खेळत असताना एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर दोन कुटुंबाच्या हाणामारीत झाले. बरगे व जिगन कुटुंबात शाब्दीक बाचाबाचीनंतर एकमेकांच्या अंगावर धावून हाणामारी सुरू झाली. दोन्ही कुटुंबातील ७ ते ८ जणांचा या वादाच्या गोंगाट्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र धारदार शस्त्राने हाणामारी झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या हाणामारीत एका अल्पवयीन मुलाचे हाताचे बोट तुटले आहे तर अन्यजण गंभीर जखमी झाले आहेत.

धारदार शस्त्राचे अंगावर वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाला यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर हातकणंगले ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर पाच जणांवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT