कोल्हापूर

आधार हरवल्याने कुटुंबाचा आक्रोश; स्क्रॅप गोळा करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कसबा बावडा झूम प्रकल्पातील घटना ; पोकलॅन्ड खाली सापडली

राजेश मोरे

कोल्हापूर : कसबा बावडा येथील झूम प्रकल्पात स्क्रॅप गोळा करत असताना पोकलॅन्डच्या बकेटमध्ये सापडून महिलेचा मृत्यू झाला. मंगल राजेंद्र दावणे (वय 50, रा. आठ नंबर शाळेजवळ, शिवाजी पेठ) असे त्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मंगल दावणे या शिवाजी पेठ तिरंगा चौक परिसरात कुटुंबासोबत राहतात. त्यांचा मुलगा सेंट्रींगचे काम करतो. त्यामुळे घरचा आर्थिक भार त्या स्क्रॅप गोळा करून उचलतात. गेली अनेक वर्षे त्या हे काम करतात. आजही सकाळी त्या नेहमीप्रमाणे स्क्रॅप गोळा करण्यासाठी कसबा बावडा येथील झूम प्रकल्पात गेल्या होत्या. येथील कचरा विलगीकरणाचा ठेका महापालिकेने एका खासगी कंपनीला दिला आहे. येथे कंपनीचे दोन कर्मचारी पोकलॅन्डच्या सहाय्याने कचरा विलगीकरणाचे काम करत होते. त्याचवेळी मंगल दावणे या स्क्रॅप गोळा करत होत्या.

दरम्यान पोकलॅंन्डच्या बकेटखाली त्या सापडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात मृतदेहाचे दोन भाग झाले. हे येथील नागरिकांच्या काहीवेळाने लक्षात आले. त्यांनी याची माहिती अग्निशामक दल व शाहूपुरी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील या पथकासह दाखल झाल्या. त्यांनी मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू केले. दुपारी त्याला यश आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठा आक्रोश करण्यास सुरवात केली. दक्षतेचा भाग म्हणून पोलिसांनी पोकलॅन्डवरील दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

घराचा आधार तुटला...

स्क्रॅप गोळा करून त्यावर मंगल दावणे या घराचा चारितार्थ चालवत होत्या. मुलगा सेंट्रीग काम करत असल्याने त्याचीही मिळकत बेताची आहे. त्यांच्या अपघाती जाण्याने दावणे कुटुंबाचा आधारच तुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayasingpur Municipal : लोकप्रतिनिधी परतले, लोकशाही फुलली; पालिकेतील बदलते चित्र, नगरसेवक-नागरिक थेट संवाद

Nagpur Mayor Election : ‘देवा’ भाऊंचा कौल कुणाला? दाणी, मोहोड, ठाकरे, जिचकार, धुरडे यांची नावे आघाडीवर

Stock Market Today : शेअर बाजारात चढ-उतार; कधी तेजी तर कधी घसरण! Indigo चर्चेत, कोणत्या शेअर्सला फायदा?

CREDAI Kolhapur : रेंटल प्रॉपर्टी कराचा फटका! कोल्हापूरच्या विकासासाठी क्रिडाईची महापालिकेकडे ठोस मागणी

Ind vs NZ 2nd T20 : संजू सॅमसन, ईशान किशनच्या फलंदाजीकडे लक्ष; रायपूरमध्ये आज भारत-न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना

SCROLL FOR NEXT