कोल्हापूर

भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

सायंकाळच्या सुमारास सांगली नाका मार्गावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमसमोर घडला.

इचलकरंजी : सांगली नाका मार्गावर एका पादचारी महिलेला दुचाकीस्वाराने ठोकरल्याने ती जागीच ठार झाली. कांचन नामदेव आळंदे (वय 55 रा.आर.के. नगर शहापुर ) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी शिवशंकर चन्नय्या हिरेमठ (वय 54 रा. यड्राव) याच्यावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास सांगली नाका मार्गावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमसमोर घडला.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवशंकर हिरेमठ हे मोटरसायकलवरून (एमएच 09 एफ.एस.5331) यड्राव फाट्यावरून सांगली नाक्याकडे जाते होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या ए.टी.एम समोर आल्यानंतर भरधाव वेगाने हिरेमठ यांच्या मोटारसायकलने पायी चालत निघालेल्या कांचन आळंदे जोरात ठोकरले. यावेळी कांचन या रस्त्यावर कोसळल्या. डोक्यात जबर मार बसला. त्वरित त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कांचन आळंदे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिस पाटील दुचाकीस्वार जगदिश भुपाल संकपाळ यांच्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार शिवशंकर हिरेमठ याच्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

कारखान्याचे कोट्यवधी लाटले, नाचगाणं करणारीला २० कोटींचा स्टुडिओ बांधून दिला; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

१० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधला अभिनेता; आईला विचारलं मुव्ही बघायला येतेस का आणि...

SCROLL FOR NEXT