crime cases in kolhapur family matter and attack from each other 
कोल्हापूर

भाऊबंदकीतील दोन राजकीय गटांत झालेल्या मारामारीत एकजण जखमी

सकाळ वृत्तसेवा

कसबा तारळे (कोल्हापूर) : करंजफेण (ता. राधानगरी) येथे भाऊबंदकीतील दोन राजकीय गटांत सकाळी मारामारी होऊन एक जण जखमी झाला. संतोष सखाराम वागरे, असे त्याचे नाव असून, राधानगरी पोलिसांत परस्परविरोधात फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

राधानगरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : विशाल वागरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील विठ्ठलाई महिला दूध संस्थेत दूध संकलन सुरू असताना विशाल मधुकर वागरे दूध घालण्यास गेले असता संस्थेविरोधात जिल्हा कार्यालयाकडे तक्रार का केलीस, असा जाब विचारीत या दूध संस्थेत दूध घालायचे नाही, अशी ताकीद अनुपम आनंदराव वागरे याने दिली. या वेळी तेथे असलेल्या संतोष वागरे याने आम्ही संस्थेचे सभासद असून, आम्हाला दूध घालण्यास तुम्ही रोखणारे कोण, असा जाब विचारताच अनुपम वागरे याने लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच बंडोपंत वागरे, सीताराम वागरे व आनंदराव वागरे यांनीही मारहाण केली.

बंडोपंत वागरे यांनी त्याविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार आपण दूध संकलन करत असताना कालच्या किरकोळ वादाचे कारण काढून संतोष वागरे व प्रवीण सदाशिव वागरे यांनी दूध संस्थेत येऊन शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. तसेच विशाल वागरे, पांडुरंग वागरे व मधुकर वागरे यांनीही शिवीगाळ केली. पोलिस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक फौजदार कांबळे व पाटील पारखे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT