crime cases in kolhapur hotel on owner and youth disputes 
कोल्हापूर

धक्कादायक! जेवणात सापडली मेलेली पाल; जाब विचारताच कर्मचाऱ्यांकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जेवणामध्ये मेलेली पाल सापडल्यावर त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणांना काल रात्री एका हॉटेलमध्ये जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले. राजेंद्रनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. राजारामपुरी पोलिस ठाण्यासमोर दोन्ही बाजूच्या तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत जखमी तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. त्यांनी शाकाहारी आणि मांसाहरी पदार्थ मागवले. यातील शाकाहारी पदार्थात मेलेली पाल सापडली. याबाबत हॉटेल व्यवस्थापकाला तरुणांनी जाब विचारला. 

याबाबतचा वाद सुरू असताना काही तरुणांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. त्याचा राग आल्याने व्यवस्थापक व तेथील बाउन्सर, वेटर यांनी तरुणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप जखमी तरुणांनी केला आहे. जखमी तरुणांना सीपीआरमध्ये दाखल केले. जखमी तरुणांच्या नातेवाइकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT