crime cases in kolhapur one don arrested by police in kolhapur 
कोल्हापूर

तुला माहिती नाही काय ? मी डॉन आहे, म्हणणाऱ्या 'गेंड्या' भाईवर गुन्हा

राजेश मोरे

कोल्हापूर : 'मी कोण आहे, तुला माहिती नाही काय, मी डॉन आहे. गेंड्या भाई म्हणतात मला...' असे सुनावत एका भाईसह त्याच्या दोघा साथिदारांनी तरूणास काठीने मारहाण केली. पाचगाव परिसरातील एका फार्म हाऊस जवळ हा प्रकार घडला. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश घोरपडे हे संभाजीनगर परिसरात राहतात. त्यांचा पाचगाव (ता. करवीर) परिसरात फार्म हाऊस आहे. मंगळवारी (ता.16) सायंकाळी ते व त्यांचा भाऊ हे दोघे फार्म हाऊसवर होते. फार्महाऊसच्या गेट समोर एक जण लघुशंका करत होता. त्याला निलेश यांनी बाजूला जाण्यास सांगितले. याचा त्याला राग आला. त्याने त्यांना 'तुला माहीत नाही का, मी डॉन आहे. गेंड्या भाई म्हणतात मला. असे सुनावत त्यांना लाथाबुक्‍याने मारहाण केली. तसेच त्याच्या सोबत असणाऱ्या दोघा अज्ञातांनी त्यांना काठीने मारहाण करत त्यांच्या मोटारीची काचही फोडली. त्याचबरोबर त्यांच्या भावाचा चेष्माही फोडून धमकीही दिली. अशी तक्रार मारहाणीत जखमी झालेल्या निलेश यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयित गेंड्या नावाच्या व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : 'मातृभाषा शिकली पाहिजे, असं मोदी नेहमी म्हणतात'; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

SCROLL FOR NEXT