crime cases in kolhapur for wastage disputes one younger dead in this crime in kolhapur 
कोल्हापूर

कचरा टाकण्याच्या वादातून तरुणाचा खून ; सख्ख्या भावांनी केला जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : येथे बुधवारी रात्री उशीरा एका तरुणाचा कचरा टाकण्यावरुन निर्घृण खून करण्यात आला. क्रांतीसिंह नाना पाटीलनगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तीन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. आकाश वांजळे (वय २५, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) असे मृताचे नाव आहे.

करवीर पोलिसांनी मध्यरात्री या प्रकरणी तिघांपैकी दोघा भावांना ताब्यात घेतले आहे तर एकाला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.  या प्रकारामुळे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे तणाव निर्माण झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः वांजळे आणि संशयित हल्लेखोरांमध्ये काही दिवसापासून वाद होते. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला व त्यांच्यात हाणामारी झाली. तिघा भावांनी वांजळेवर जीवघेणा हल्ला केला. गंभीर अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. वांजळे याच्या नातेवाईकांसह मित्रांनी शासकीय आवारात गर्दी केली होती. त्यामुळे तेथे तणाव होता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT