crime in kolhapur with jewelry shop owner demand 5 lakh rupees in kolhapur
crime in kolhapur with jewelry shop owner demand 5 lakh rupees in kolhapur 
कोल्हापूर

महिलेच्या छायाचित्राचा फलक लावणे सराफाला पडले महागात ; पाच लाखाच्या खंडणीची झाली मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्वेलर्स दुकानाच्या फलकावर महिलेचे छायाचित्र लावल्याच्या कारणातून तिघा अज्ञातांनी दुकानदाराकडे पाच लाखांची खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास दुकान फोडण्याची धमकीही त्यांनी दिली. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत महिलेसह चौघा संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

पोलिसांनी दिलेली माहिती, शहरातील एका ज्वेलर्स दुकानावर फलक लावला होता. त्यावर दागिने परिधान केलेल्या एका महिलेचे छायाचित्र होते. हा फलक संबंधित महिलेच्या निदर्शनास आला तिने संबंधित दुकानदाराला याबाबत जाबही विचारला. त्यानंतर तिच्या तिघा साथीदारांनी दुकान मालकाला लावलेल्या फलकाबाबत विचारणा केली. त्यांनी हा फलक पेंटिंग करून घेतल्याचे सांगितले. मात्र त्यांनी विनापरवाना छायाचित्राचा वापर केल्याबद्दल दुकान मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही खंडणी नाही दिली तर दुकान फोडण्याची धमकीही दिली. दुकान मालकाने हा प्रकार जुना राजवाडा पोलिसांना सांगितला. याप्रकरणी संशयित महिलेसह खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू होती.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT