कोल्हापूर

जावई त्रास द्यायचा, मुलीचे आईवडील संतापले, रात्री बसस्टॅंडजवळ गाठलं अन् भयानक घडलं, कोल्हापुरातील घटना

Kolhapur Crime: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू सासऱ्यांनी आपल्या जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणी दोघांना अचक करण्यात आली आहे.

Vrushal Karmarkar

कोल्हापुरात एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सासू आणि सासऱ्यांनी मिळून आपल्याच जावयाचा गळा दाबून खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की मृत व्यक्ती आपल्या पत्नीला त्रास देत असे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हणमंतप्पा काळे (४८) आणि गौरव काळे (४५) असं आरोपी जोडप्याचं नाव आहे. तर संदीप शिरगावे असं मृत जावयाचे नाव आहे. काळे दाम्पत्य कोल्हापूर शहरापासून ८० किमी अंतरावर असलेल्या गडहिंग्लजचे रहिवासी होते आणि शिरगावे हे शिरोळचे रहिवासी होते. कोल्हापूर सीबीएस येथे एका व्यक्तीचा मृतदेह वाहतूक कर्मचाऱ्यांना सापडला. गुरुवारी सकाळी काही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शिरगावे यांना सेंट्रल बस स्टँड (सीबीएस) कॉम्प्लेक्समधील एका दुकानाजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले असता पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी शिरगावे यांना सीपीआर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले. बसस्थानक परिसरात संदीपच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक बॅग आणि काही कागदपत्रे आणि त्याच्या पत्नीचा फोन नंबर सापडला.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "त्याच्या पत्नीने आम्हाला सांगितले की, त्याचे आई-वडील गडहिंग्लजला बसमधून शिरगावला निघाले होते. आम्ही बसस्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि ती क्लिप गडहिंग्लज पोलिसांशी शेअर केली, ज्यामध्ये एक जोडपे दिसले होते, याची पुष्टी गडहिंग्लज पोलिसांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे जोडपे म्हणजे हणमंतप्पा आणि गौरव काळे.

त्यांची मुलगी संदीप शिरगावेवर नाराज असल्याने, हणमंतप्पा आणि गौरवने त्याला बुधवारी गडहिंग्लज बसस्थानकावर सोडले. शिरगावे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहून ते जोडपे त्याला पुन्हा बसस्थानकात घेऊन गेले. ते कंडक्टरशिवाय बसमध्ये चढले आणि मध्यरात्री जोडप्याने जावयाचा गळा दाबून खून केला. असं तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT