Kolhapur Crime News sakal
कोल्हापूर

Kolhapur Crime News: मजरेवाडी खून प्रकरणाचाअवघ्या २४ तासांत छडा

नागराळेच्या संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड : मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील सावकार कल्लाप्पा देबाजे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी चिक्कोडी तालुक्यातील देवर्षीला आज अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा २४ तासांत छडा लावत संशयित माळाप्पा कर्याप्पा हेग्गण्णावार (वय २५, रा. नागराळे, ता. चिक्कोडी) याला जेरबंद केले.

त्याने खुनाची कबुली दिली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी आज दिली. देबाजे हा संशयित माळाप्पा याच्या पत्नीकडे वाईट नजरेतून पाहत होता आणि वारंवार मानसिक त्रास देत होता. त्यामुळे खून झाल्याची माहितीही भांगे यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संशयित माळाप्पा देव सांगण्याचे काम करतो. तो देबाजे याला होत असलेल्या त्रासाबद्दल विचारणा करण्यासाठी जात होता. संशयित माळाप्पा याच्या पत्नीकडे देबाजे वाईट नजरेने पाहून त्रास देत होता. पत्नीने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर माळाप्पा याने देबाजेला आठ दिवसांपूर्वी समजावून सांगितले होते. मात्र, या गोष्टीचा राग माळाप्पा याच्या मनात होता.

सोमवारी (ता. १७) दुपारी दीडच्या सुमारास माळाप्पाने देबाजेला तुझा होणारा त्रास कमी करण्यासाठी उतारा करावा लागेल, असे सांगून अगरबत्ती अन् लिंबू घेऊन मजरेवाडी ते कुरुंदवाड जाणाऱ्या रस्त्यावरील एका महाविद्यालयाच्या मागे बोलावून घेतले. लिंबू उतरविण्याचा बहाण्याने देबाजेला काटेरी झुडपात नेऊन दोरीने त्याचे हात-पाय बांधले. माळाप्पाने कुऱ्हाडीने देबाजेच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला.

दरम्यान, माळाप्पा याच्या संपर्कातील आणखी दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुरुंदवाड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT