crime register against boyfriend kolhapur kurundwad kolhapur crime news 
कोल्हापूर

पहिल्या प्रेमानेच दिला दगा; फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन्  

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड (कोल्हापूर) - लग्नापूर्वीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मिलिंद मधुकर पाटील (सैनिक टाकळी) याच्याविरुद्ध येथील पोलिसांत बलात्कार व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे. 

संशयित मिलिंद पाटील याने पीडित महिलेला वारंवार फोन करून माझा फोन उचलत जा, मला फोन करत जा नाही तर लग्नापूर्वीचे तुझे फोटो व्हायरल करेन, आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सासरच्या लोकांना माहिती सांगेन व तुला ठार मारेन, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित मिलिंद पाटील याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. तपास इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी करीत आहेत.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT