crime special story kolhapur crime marathi news , kolhapur news
crime special story kolhapur crime marathi news , kolhapur news  
कोल्हापूर

 सावधान: भाडेकरू ठेवताय, यामुळे तुम्ही याल अडचणीत

राजेश मोरे

कोल्हापूर :  भाडेकरू ठेवताय, तर राहा सावधान, असे म्हणण्याची वेळ आली आहे. गुन्हेगार लपण्यासाठी भाड्याच्या घराचा आधार घेऊ लागले आहेत. हे पोलिस कारवाईतून पुढे आले. संपूर्ण माहितीसह भाडेकरूची पोलिस ठाण्यात नोंद न करण्याची वृत्ती भविष्यात घरमालाकाला भारी पडू शकते.

 
शहराची लोकसंख्या सुमारे साडेपाच लाखांहून अधिक आहे. नोकरी व्यवसायातील स्पर्धेमुळे अनेकजण सध्या दोन चार खोल्या बांधून तेथे भाडेकरू ठेवून उत्पन्नाचे साधन निर्माण करत आहेत. नोकरी व्यवसायासाठी बाहेरील जिल्हा प्रांतातून येणाऱ्यांची संख्या शहरात वाढू लागली आहे. भाडेकरूही अपोआप उपलब्ध होऊ लागले.

शहराच्या मुख्य भागासह उपनगर परिसरात भाडेकरूंची संख्या वाढू लागली आहे. हजाराच्या पटीत डिपॉिझट घेऊन दरमहा भाडेपट्टीवर खोल्या भाड्याने दिल्या जातात, पण हा भाडेकरू ठेवताना पोलिस दप्तरी नोंद तर सोडाच, पण तो कोण त्याची मागील पार्श्‍वभूमी काय? हे सहसा तपासले जात नाहीत. असा भाडेकरू जर गुन्हेगार निघाला, तो गैरकृत्य करून जर पळून गेला तर त्याचा नाहक त्रास घरमालकाला सहन करावा लागतो. सरनोबतवाडी परिसरात तरुण स्वतःचे नाव बदलून राहत होता. त्याच्याकडे तसे आधारकार्डही होते, पण हा भाडेकरू राजस्थानमधील मोस्ट वाँटेड गुंड होता. त्याला राजस्थान पोलिसांनी छापा टाकून जेरबंद केले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला तसे घरमालकासह शेजारीही धक्का बसला. 


गुन्हेगार गैरकृत्यासाठी भाड्याच्या घराचा आधार घेत आहेत. त्यामुळे भाडेकरू ठेवताना अनेकदा विचार करण्याची वेळ आली आहे. भाडेकरू ठेवताना त्याचे नाव, गाव, नोकरी, व्यवसायाचे ठिकाण, कुटुंबाची माहिती, फोटोसह आधार कार्डासह आवश्‍यक कागदपत्रे घ्या. त्याची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करा, असे पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते, पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. 


भाडेकरूंची नोंद न करण्याची कारणे...
 घरफाळा वाढण्याची भीती
 भाडेकरूवर विश्‍वास ठेवण्याची वृत्ती
 पोलिस ठाण्यात जाण्यास टाळाटाळ
 नोंद न करणाऱ्यांना घरमालकांवर कारवाईचा अभाव 

दृिष्टक्षेपात...
 शहराची लोकसंख्या  - ५ लाख ५० हजारांच्या घरात
 महापालिकेत भाडेकरूंची नोंद - २२ हजार ५०० हून अधिक
 पोलिस ठाण्यातील नोंद - ४५४
 परप्रांतीय भाडेकरू - ४७
 परदेशी विद्यार्थी भाडेकरू - १८

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT