Crime on the sugar factory MD kolhapur marathi news 
कोल्हापूर

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोल्हापूरातील 'या साखर कारखान्याच्या' एम डी वर गुन्हा दाखल....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लाॕकडाऊन असतानाही हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सह साखर कारखाना लि चे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी ऊस तोडणी हंगाम पूर्ण झाल्याने लेटर पॕडवर गावी जाण्यास परवानगी देवून संचारबंदी चे उल्लंघन केले. याबाबत प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचे  उपसंचालक(साखर) एस एन जाधव यांनी हातकणंगले पोलीसांत फिर्याद दिली.


 या फिर्यादित म्हटले आहे की,

कोरोना विषाणू(कोवीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यात  संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक  वगळून अन्य वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही शरद सहकारी साखर कारखाना लि. चे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी कारखान्याच्या लेटर पॕडवर मजूर रामकिसन भगवान वायनसे (रा. नामेवारी ता. केज जि. बीड) हे  कारखान्याकडील गळीत हंगाम २०१९-२०२० ऊस तोडणी वाहतूक पूर्ण झाल्याने गावी जात आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना जाण्यासाठी अडथळा करु नये, सोडण्यात यावे. अशा आशयाचे पत्र देवून  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
 कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४(१)(३) प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने भा दं वि सं क १८८ ,२६९, २७०,२९१ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा केल्याने हातकणंगले पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक भावड हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT