The criminals who broke the beer bar pretended to be Corona in kolhapur 
कोल्हापूर

पोलिसांनी पकडताच तो म्हणाला 'मला कोरोना झालाय साहेब...' पण पोलिसांनी कोरोना कक्षात नेताच वेगळच सत्य समोर आलं...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळात मद्याची व बिअर बार फोडणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात करवीर पोलिसांना यश मिळाले. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अटक केलेल्या एका संशयितांने कोरोना झाल्याचा तर दुसऱ्याने आजारपणाचा बहाणा केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पण सीपीआरमधील कोरोना कक्षात नेल्यानंतर संशयिताचा आजार अपोआप बरा झाला.

अटक केलेल्या संशयितांची नावे - अविनाश शांताराम कोकाटे (वय 22, रा. एसएसबी बोर्ड, मोहीतेनगर), सतिश धरमा बाटुंगे (वय 23, रा. जयसिंगपूर, सध्या रा. मोहितेनगर) आणि मोहित मोतीलाल मिनेकर (वय 22, रा. पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, साबळेवाडी (ता. करवीर) येथील दर्शन बार, त्यापाठोपाठ पाचशे मीटर अंतरावरील श्री बिअर शॉपी 21 एप्रिलला फोडला. हातकणंगले येथील सम्राट बार चोरट्यानी फोडण्याचा प्रकार घडला होता. याचा तपास करवीर पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अविनाश कुमार, पोलिस निरीक्षक सुनील पाटील करत होते. गुन्हे शोध पथकाला पाचगाव येथे संशयित मोहित लॉकडाऊनच्या काळात मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याच्यासह त्याचे साथिदार संशयित अविनाश कोकाटे, सतिश बाटुंगे या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान चौकशीत त्या तिघांनी साबळेवाडी व हातकणंगले येथील तीन बार फोडल्याची कबुली दिली. ही कारवाई अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पाटील, कर्मचारी प्रशांत माने, राजू जरळी, गुरू झांबरे, सुहास पाटील, दीपक घोरपडे, युक्ती ठोंबरे, रामा माळी यांनी केली.

संशयितांचा आजार झाला बरा...

चौकशी दरम्यान संशयित अविनाश कोकाटे याने घसा दुखत आहे, छातीत दुखत आहे, कोरोनाची लक्षणे दिसतात असा बहाणा करण्यास सुरवात केली. तशी पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी त्याला थेट तपासणीसाठी सीपीआरमधील कोरोना कक्षात नेले. डॉक्‍टरांकडून त्याची तपासणी करण्यात आली. मात्र यात कोरोना संबधी त्यांना कसलीच लक्षणे दिसून आली नाही. तसा संशयिताचा आजार बरा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. त्याचवेळी दुसरा संशयित मोहित मिनेकर हा तब्येत खालावली, चक्कर येते अशी कारणे सांगू लागला. त्यानंतर त्यालाही रुग्णालयात नेले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानंतर त्याचेही पितळ उघडे पडल्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT