Crocodiles seen on the river Panchaganga in Ichalkaranjit 
कोल्हापूर

इचलकरंजीत पंचगंगा नदीकाठावर मगरीचे दर्शन ; वन विभागाचा सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - येथील पंचगंगा नदी पात्रात गुरुवारी दुपारी दोन मगरीचे दर्शन झाले. दरम्यान या पार्श्‍वभूमीवर पोलिस आणि काही नागरिकांनी नदी पात्रात भेट देवून पाहणी केली. याबाबत वन विभागास कळविण्यात आलेने हातकणंगले विभागाचे वनपाल घनश्याम भोसले यांनी पथकासह पंचगंगा नदीकाठी भेट देऊन पाहणी केली.

पंचगंगा नदी पात्रात मगरीचा वावर असल्याचे गेले अनेक दिवस चर्चा होती. सध्या नदीपात्राकडेचा वावर कमी झाला आहे. तसेच पोहायला जाणार्‍या नागरिकांनी गेले काही दिवस लॉकडाऊनमुळे त्या भागातील वावर कमी केला आहे. आज दुपारी काही शेतकरी नदीकडेला शेतात काम करीत असताना नदी जॅकवेलजवळ मगरीचे दर्शन झाले. त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पात्रात आलेल्या मगरीचा व्हिडिओ युवकांनी पोलिसांना दाखवले.

याबाबत पोलिसांनी वन विभागाशी संपर्क साधला. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी वनपाल घनश्याम भोसले यांनी पथकासह पंचगंगा नदीकाठी भेट दिली आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वनपाल भोसले म्हणाले, अंदाजे चार ते साडेचार फुट लांबीची ही मगर असून सोबत एक लहान पिल्लू असावे. ही मगर स्थलांतरीत असल्याकारणाने एकाच ठिकाणी राहू शकत नाही. मात्र पंचगंगा नदीपात्रात मासे धरण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमुळे पुढे सरकण्यात मगरीला अडथळे निर्माण होत आहेत. अब्दुललाट परिसरातही दोन मगरींचा वावर आहे. त्यामुळे येथील नदीकाठावरील शेतकर्‍यांसह नदीकाठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. येथील पंचगंगा नदीकाठावरील शेतकार्‍यांसह नागरिकांनी नदीपात्राजवळ फिरकू नये. तसेच ज्यांनी नदीपात्रात जाळ्या लावल्या आहेत. त्यांनी त्या तातडीने काढून घ्याव्यात, असे आवाहन भोसले यांनी केले.

काही दिवस सांभाळून....

  • पंचगंगा नदीकाठावर सकाळी पोहायला, फिरायला येणे टाळा.
  • नदीकाठावरील शेतकर्‍यांनी सावध रहावे. 
  • नदीशेजारच्या गावानी सतर्कता रहावे. 
  •  नदीच्या पात्रात जाणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

SCROLL FOR NEXT