Crowd of devotees at Datta Mandir in Nusihwadi 
कोल्हापूर

नृसिंहवाडीतील दत्तमंदिरात भाविकांची गर्दी 

जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱे दत्त मंदिर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उघडण्यात आले. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांपासून बंद असणारे दत्त मंदिर भाविकांनी फुलून गेले. एरव्ही बंद असणाऱ्या नौकानयनाला भाविकांनी पसंदी दिल्यामुळे कृष्णाघाट भाविकांनी फुलून गेला. बंद असणाऱ्या मिठाई व्यापाऱ्यांची पुन्हा मिठाई बनवण्यासाठी  आपल्या कुटुंबासह लगबग  वाढली आहे. 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने दत्त मंदिर शासन निर्णयानुसार खुले करण्यात येणार असल्यामुळे त्यां निमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दत्त देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव पुजारी व सचिव गोपाळराव पुजारी व ट्रस्टी विकास पुजारी, प्रा. गुंडो पुजारी, अमोल विभूते, प्रमोद कडू पुजारी यांच्या पुढाकाराने नेटके करण्यात आले होते.

भाविकांना दर्शन देण्यासाठी दत्ता देवस्थान ट्रस्ट  सज्ज झाले असून दर्शनासाठी एकच मार्ग खुला करण्यात आला आहे. तत्पूर्वी भाविकांचे थर्मल टेंस्टीग व सॅनीटायझेशन करूनच टप्प्याटप्प्याने गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मुख्य मंदिरात सोडण्यात येत आहे. ध्वनिक्षेपकावरून अत्यावश्यक सूचनांचा ही भाविकांना सांगण्यात येत आहेत. 

पहाटे काकड आरती पासून सायंकाळी शेजारती पर्यंत सर्व धार्मिक कार्यक्रम ब्रह्मवूद त्यांच्या सहकाऱ्यांना मोठ्या भक्तिभावाने सुरू आहेत. मात्र कोणत्या पद्धतीने मंदिर परिसरात होणारे भाविकांसाठीचे अभिषेक इतर धार्मिक विधी सेवा कोरनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून देवस्थान प्रशासनाने बंद ठेवले आहेत. 

आठ महिन्यापासून बंद असणारे 54  मिठाई दुकानदाराचे मिठाई बनवण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यामध्ये पेढे, बर्फी, बासुंदी, खवा यांची मोठ्या पद्धतीने विक्री होताना लॉकडाऊन नंतर प्रथमच पहायला मिळते. 

छोटी  फिरते विक्रेते यांनी सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा आपले दुकाने थाटली आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी नूसिहवाडी पोलीस दरक्षेत्राचे सर्व कर्मचारी सेवा बजावत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : नेत्यांची लागणार कसोटी! विधानसभा-लोकसभेत दिलेला 'तो' शब्द पाळण्याचे मोठे आव्हान, कार्यकर्त्यांचा 'पैरा' फेडावा लागणार

Zudio Sale : दिवाळीनिमित्त Zudio मध्ये लागलाय खास सेल; खरेदीवर 70% ते 90% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

Latest Marathi News Live Update : जीआरनंतर मराठवाड्यात कुणबीचे केवळ २७ प्रमाणपत्र- तायवाडे

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

SCROLL FOR NEXT