Crowd on the first day for Gokul Purchase of 260 applications from 76 people 
कोल्हापूर

"गोकुळ'साठी पहिल्याच दिवशी गर्दी; अरुण डोंगळे, विश्‍वास पाटील यांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी माजी अध्यक्ष व संचालक अरुण डोंगळे, विश्‍वास पाटील, वसंत खाडे यांच्यासह सात उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले. या सर्वच उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती.

 दरम्यान, आज 76 जणांकडून 260 अर्ज नेले आहेत. आज अर्ज दाखल केलेल्या अन्य उमेदवारांत "कुंभी' बॅंकेचे चेअरमन अजित नरके, माजी संचालक बाबासाहेब चौगले, संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत व महाबळेश्‍वर शंकर चौगुले यांचा समावेश आहे. 

"गोकुळ'च्या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान होत आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. गुरुवारचा मुहुर्त साधत पहिल्या दिवशीच सात उमेदवारांनी 12 अर्ज दाखल केले. सर्वात पहिला अर्ज माजी अध्यक्ष आणि सत्तारूढ गटाचे बंडखोर संचालक विश्‍वास पाटील यांनी दाखल केला. त्यांनी एकाच वेळी चार अर्ज दाखल केले. त्यानंतर श्री. डोंगळे, वसंत खाडे यांचे अर्ज दाखल झाले. कुंभी बॅंकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्यासोबत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.  डोंगळे,  खाडे,  नरके, चुयेकर यांनी प्रत्येक एक तर बाबासाहेब चौगले व महाबळेश्‍वर चौगुले यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. 

सुनावणी पुन्हा लांबणीवर 
निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून "गोकुळ'ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आजही झाली नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाचे कामकाज ऑनलाईन सुरू असल्याने ही याचिका सुनावणीला न आल्याचे सांगण्यात आले. यावर आता उद्या (ता. 26) सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT