crowd to walk the Rankala subsided 
कोल्हापूर

रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्यांची गर्दी ओसरली 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : दुधाळी येथे कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर रंकाळा परिसर हादरुन गेला आहे. या दोन्हींपैकी एक व्यक्‍ती अंबाई टॅंक परिसरात काही वेळासाठी येवून गेल्याचे समजल्यानंतर या भागात महापालिकेने औषध फवारणी केली. त्यामुळे या परिसरात सकाळ-संध्याकाळी फिरावयास येणाऱ्या लोकांची गर्दी मंगळवारी ओसरलेली पहायला मिळाली. 

कोरोनाचा जिल्ह्यासह शहरात प्रसार वाढला आहे. शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सोमवारी शहरातील दुधाळी परिसरातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शहराचा गंगावेश पासून रंकाळ्याकडील भाग तसेच बुधवार पेठेचा बराचसा भाग सिल करण्यात आला आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी या भागात औषध फवारणी सुरु आहे.

दोन पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक रुग्ण अंबाई टॅंक येथे येवून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या ठिकाणी औषध फवारणी केली. परिणामी या परिसरातील सर्वच नागरिकांना मोठी धास्ती लागून राहिली. परिणामी संध्याकाळी फिरावयास येणारे बहुतांश लोक फिरकले नाहीत. कोरोनाच्या धास्तीने मंगळवारी देखील सकाळी फिरावयास येणाऱ्या लोकांची गर्दी ओसरलेली पहायला मिळाली. भाजी विक्रेत्यांनीही या भागात भाजी विकण्याऐवजी शालिनी पॅलेश हॉटेलच्या मागे भाजी विक्री केली. 

दृष्टिक्षेप 
- दुधाळी परिसरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह सापडले 
- एक रूग्ण अंबाई टॅंक परिसरात येऊन गेला 
- फिरायला येणाऱ्यांची गर्दी ओसरली 
- गंगावेश पासून रंकाळ्याकडील भाग सील 
- परिसरात औषध फवारणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT