Crowded, now the market is closed;  
कोल्हापूर

गर्दी केलीत, बाजार बंद; आता फिरून विका भाजीपाला 

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील पालिकेने मंगळवारी (ता. 14) भरणारा भाजीपाला बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी फिरून भाजी विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. आज भाजीपाला बाजारात झालेली गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

गेल्या 72 तासानंतर आज सकाळच्या सत्रात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. या कालावधीत नागरिकांना भाजीपाला खरेदी व किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. शहरातील विविध 11 ठिकाणी भाजीपाला विक्री करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. मात्र या ठिकाणी आज सोशल डिस्टन्सिंग न पाळता मोठी गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पालिकेने मंगळवारी (ता.14) सकाळच्या सत्रात भरणारा भाजीपाला बाजार बंद करण्या ऐवजी प्रत्येक वार्डात फिरून भाजी विक्री करण्यात मंजुरी देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून 12 जुलै पूर्वी भाजीपाला विक्रेत्यांनी परवानगी घेण्याची आवश्‍यकता आहे. याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली आहे. 

दृष्टिक्षेप 
- भाजीपाला बाजारात होत होती गर्दी 
- 11 ठिकाणी केली होती सोय 
- सोशल डिस्टन्सचा उडाला बोजवारा 
- प्रत्येक वार्डात फिरून भाजी विक्रीची यापुढे मुभा 
- 12 जुलैपुर्वी घ्यावी लागणार विक्रेत्यांना परवानगी 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT