Dajipur Sanctuary Open to tourists, Khasgi vehicles banned in the sanctuary area 
कोल्हापूर

दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी खुले, खसगी वाहनांना अभयारण्य क्षेत्रात बंदी

मोहन नेवडे

राधानगरी ः जागतीक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेले जैवविविधतेने संपन्न दाजीपूर अभयारण्य आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले. मात्र यंदाच्या पर्यटक हंगामापासून पर्यटकांच्या खाजगी वाहनांना अभयारण्य क्षेत्रात बंदी लादण्यात आली आहे. आता यापुढे स्थानिक समितीकडे नोंदणी झालेल्या, वाहनातूनच 'जंगल सफारी' करता येणार आहे. त्यासाठी समितीने भाडेतत्त्वावर पर्यटकांसाठी वाहनांची व प्रशिक्षित गाईडची सुविधा देण्यात येणार आहे. 
गेल्या सहा दशकांपासून पर्यटकांच्या खाजगी वाहनांना अभयारण्य क्षेत्रात प्रवेशाची मुभा होती. यंदा पहील्यांदाच आधी कोरोना आणि नंतर पावसामुळे अभयारण्य तब्बल आठ महिने पर्यटकांसाठी बंद होते. आता कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन पर्यटकांना बंधनकारक करण्यात आले आहे. अभयारण्य क्षेत्रात सकाळी सहापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत या वेळेतच वाहनांना प्रवेश राहणार आहे. शनिवारी अचानक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, विभागीय अधिकारी विशाल माळी यांनी भेट दिली. रस्ते व पाहणी करून आजपासून अभयारण्य खुले करण्यास परवानगी दिली. 

यंदाचा पर्यटन हंगाम दृष्टिक्षेप- 
-स्थानिक समितीकडून पर्यटकांसाठी दहा वाहनांची व्यवस्था. 
-पर्यटकांच्या वाहनांसाठी दाजीपुरात सुरक्षित वाहनतळ. 
-स्थानिकांच्या वाहनांचा भाडेतत्त्वावर पर्यटकांकडून वापराने रोजगाराची नवे साधन. भाडेतत्वावरील वाहनांवर समितीचे स्टिकर. 
-स्थानिक समितीचे पर्यटकांवर नियंत्रण राहणार. 
-जंगल सफारीसाठीच्या आठ आसन क्षमतेच्या वाहनाला अठराशे रुपये भाडे. 
-अभयारण्य प्रवेशापूर्वी मास्क, सॅंनीटायझर वापर , सुरक्षित अंतराची अट. 
-स्थानिक गाईडमुळे पर्यटकांना मिळणार जैवविविधता वन्य पशुपक्ष्यांची परिपूर्ण माहिती. 
-जबाबदार पर्यटनांची संकल्पना पर्यटक सुरक्षिततेवर भर. 

 
पहिल्याच दिवसापासून पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे समितीची पाच वाहने पर्यटकांना घेऊन अभयारण्य क्षेत्रात गेली तीन तासांपर्यंत वाहनांना अभयारण्य क्षेत्रात फिरता येते. 
- विलास पाटील, अध्यक्ष स्थानिक परिस्थितीकीय समिती, दाजीपूर - वलवण.

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT