Damage To Agriculture In Ajara Taluka Caused By Tusker Elephant Kolhapur Marathi news 
कोल्हापूर

टस्कर हत्तीने भिरकावले काजूचे झाड

रणजित कालेकर

आजरा : टस्कर हत्ती चांगलाच आक्रमक झाल्याचे खानापुर ग्रामस्थांना निदर्शनास आले. त्याने येथील शेतकरी राजाराम बाळु देसाई यांचे भले मोठे काजूचे झाड मुळा सकट जमिनीतून उखडून भिरकावले. त्याच्या आक्रमकतेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे बंद केले आहे. दरम्यान, टस्कर हत्तीने ऊस व बांबूच्या पिकाचे नुकसान केले. 

गेले पाच सहा दिवस टस्कर हत्ती खानापूर, विटे, पोळगाव परिसरात वावरत आहे. दरवर्षी प्रमाणे सुगीच्या दिवसात त्याने या परिसरात फेरफटका मारला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चाळोबाच्या जंगलात राहूटीला असलेला टस्कर ऊस व बांबू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. चार दिवसांपुर्वी हत्तीने खानापूर परिसरात भात, ऊस, नागली पिकाचे नुकसान केले होते.

तो या परिसरात आल्याने शेतकऱ्यांनी घाई गडबडीत भात कापणी व मळणीची कामे उरकली आहेत. त्यामुळे हत्तीने आते ऊस व मेसकाठीचे नुकसान सुरू केले आहे. देसाई यांचे फळी शेतातील काजूचे झाड त्याने सोंडेने उखडले. ते दुरवर भिरकावले. त्याने त्या झाडाचा बुंधा रागाने जमीनीवर आपटला असून तेथे किमान एक फुटाचा खड्डा पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्याचा हा अवतार बघुन शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे बंद केले आहे. हत्तीने युवराज जाधव, कृष्णा जाधव यांच्या मेसकाठीचेही नुकसान केले आहे. 

टस्कराची हुलकावणी 
टस्कर जेथे जाईल तेथे वनविभागाचे पथक पाळतीवर आहे, पण टस्कराने या पथकाला गुंगारा देत नुकसान सुरूच ठेवले आहे. तो वनविभागाला सात्तत्याने हुलकावणी देत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT