Damage To Sugarcane And Maize Crops In Ajara Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वनगाई, गव्यांकडून ऊस, मका पिकांचा फडशा 

सुभाष पोवार

भादवण : आजरा तालुक्‍यातील कोवाडे पंचक्रोशीमध्ये वनगाई व गव्याच्या कळपाने अक्षरक्षः धुमाकुळ घातला आहे. ते ऊस व मका पिकांचा फडशा पाडत आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण कसे करावे, या चिंतेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यात उन्हाळी पिक फस्त होत आहेत. वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

चित्रीचे मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने कोवाडे, निंगुडगे, पेद्रवाडी, हाजगोळी, सरोळी, दाभेवाडी येथील शेतकरी सुखावला आहे. पडिक असलेले क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शेतकरी उसाबरोबर मका, भुईमुग, तीळ, सुर्यफुल यासारखी विविध पिक घेत आहेत. पण या काही वर्षात या परिसरात वनगाई व गव्याच्या कळपांचा उपद्रव वाढला आहे.

रात्रीच्या वेळी हे कळप शेतात उतरून पिकांचा फडशा पाडत आहेत. शेतकऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी पारंपारिक बुजगावणेसह तारेचे कुंपन, डबे वाजवणे, कॅसेटचे रिळ, फटाके फोडणे यासह विविध उपाय योजनांचा अवलंब केला आहे, पण शेतकऱ्यांना गवे व वनगाई बधेनासे झाले आहेत.

निंगुडगे येथील विनायक विश्‍वास सावंत यांचे दोन एकरातील उसाची लावण फस्त केली आहे. त्याचबरोबर धनाजी यशवंत देसाई, तानाजी बाबुराव देसाई यांचेही उसाचे नुकसान केले आहे. कोवाडे येथील नागोजी गुंडू ऱ्होरटे, परशराम विठोबा होडगे, आप्पासो संतराम घोळसे यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

मलिग्रे, चाळोबा डोंगर परिसर व कोवाडे येथील लिलाव रांग नावाच्या डोंगरात गव्यांची राहूटी आहे. येथून ते सायंकाळच्या सुमाराला उतरतात व पिकांचा फडशा पाडतात. या कळपांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वनविभागाकडे करत आहेत. 

रात्री जागू लागल्या....! 
गवे व वनगाईंपासून पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीची राखण वाढवली आहे. शेतात माळे घालून शेतकरी पिकांचे संरक्षण करीत आहेत, पण तरीदेखील गवे व वनगाईंकडून पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरुच आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Liver, Kidney, Gut Detox: फक्त १४ दिवसांत करा सगळं शरीर स्वच्छ! आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT