Dance classes should be allowed two days a week 
कोल्हापूर

आठवड्यातून दोन दिवस नृत्य क्‍लासेसना परवानगी द्यावी

नंदिनी नरेवाडी


कोल्हापूर ः कोरोनाच्या वैश्‍विक महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाउन झाले. काही महिन्यांपूर्वीच लॉकडाउनवरील निर्बंध हटवताना जगण्याची आशा पुन्हा निर्माण झाली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाउन लावण्यात येणार आहे. या लॉकडाउनचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसतो आहे. तसेच त्याची झळ नृत्य कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. या नृत्य कलाकारांची दखल घेऊन त्यांना मदत करण्याची मागणी नृत्य परिषदेच्या सदस्यांनी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच आठवड्यातून दोन दिवस फक्त दोन तास नृत्याचा क्‍लास घेण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी याद्वारे केली आहे. 
नृत्य परिषद, कोल्हापूरचे अध्यक्ष दीपक बीडकर, सचिव रोहित पाटील, प्रसिद्धी प्रमुख जान्हवी शिंगटे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 
पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील नृत्य कलाकार विशेषतः तीन नृत्य प्रकारांत काम करतात. शास्त्रीय नृत्य, लोककलावंत आणि पाश्‍चिमात्य नृत्य या तीन नृत्य प्रकारांतील शिक्षण हे नृत्यकलाकार देत असतात. खासगी नृत्य क्‍लासेस चालविताना लॉकडाउनमुळे बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते. अनेक शिक्षकांचे क्‍लासेस हे भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत घेतले जातात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातील मोठा भाग हा भाड्यापोटी द्यावा लागतो. तसेच शालेय स्नेहसंमेलन, स्पर्धा, रिऍलिटी शो, व्यावसायिक इव्हेंटस्‌ आणि लग्नसमारंभातील संगीत अशा माध्यमातून या नृत्य कलाकारांना रोजगार मिळतो. 
कोरोनामुळे कार्यक्रमांवर निर्बंध आणल्यामुळे हा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला आहे. नृत्यकलेवर अवलंबून असणाऱ्या पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कलाकारांची घरे स्वतःची नाहीत. त्यामुळे घरभाडे, जीवनावश्‍यक वस्तू, मुलांचे शिक्षण, कर्ज हा खर्च भागवायचा कसा, हा प्रश्‍न नृत्य कलाकारांसमोर आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस फक्त दोन तास क्‍लास घेण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

तीन हजारांवर नृत्यकर्मी 
कोल्हापूर शहरात सुमारे 200, तर जिल्ह्यात 475 नृत्याचे क्‍लासेस आहेत. त्यावर सुमारे तीन हजार नृत्यकर्मी व तंत्रज्ञ अवलंबून आहेत. क्‍लासेसबरोबरच विविध वाद्यवृंदात डान्स शोज करणाऱ्यांची संख्या तर अधिक वाईट आहे. कार्यक्रमच बंद असल्याने त्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले असल्याचे दीपक बीडकर यांनी सांगितले. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT