Danger level crossed by Panchganga river Kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग : पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; कोल्हापूरवर महापूराचे सावट

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - पंचगंगा नदीवर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मच्छिंद्र झाली. परंपरागत मच्छिंद्री झाली म्हणजे महापूर आला असे मानले जाते. सलग दोन-अडीच दिवस झालेल्या पावसामुळे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पुलावरील कमानीजवळ माशा सारख्या असलेल्या आकारावर पाणी आले आणि कोल्हापुरात महापूर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापुरात अतिवृष्टी झाली की मच्छिंद्री झाली काय ? असे विचारले जाते. कारण पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर साधारण 43 फूट पाणी पातळी पोहोचल्यानंतर धोका पातळी गाठल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. ज्यावेळी मच्छिंद्री होईल, त्यावेळी कोल्हापुरात महापूर आला असे मानले जाते.

मच्छिंद्री म्हणजे काय ? व्हिडीओ पाहा...

कोल्हापूर शहरात पाणी घुसण्याची शक्यता

गेल्या 48 तासांमध्ये धरणातील पाणी नदीमध्ये न सोडता ही पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल वीस फुटाने वाढली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर शहरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राजाराम बंधारा आहे. या बंधाऱ्यावर नदीपात्रातील पाण्याने 39 फूट गाठले तर इशारा पातळी मानली जाते. तसेच 43 फुटावर पाणी पोहोचले तर धोका पातळी समजून शहरात पाणी येऊ शकते असे संकेत आहेत. त्यामुळे धोका पातळी झाल्यानंतर स्थलांतराचा वेग वाढविण्यात येतो.

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाजवळ कमानीला असलेल्या माशाच्या आकाराजवळ जोपर्यंत पावसाचे पाणी लागत नाही, तोपर्यंत कोल्हापूरला महापुराचा कोणताही धोका नाही, असे मानले जाते. मात्र या माशाच्या आकारावरून पाणी ओलांडू लागले तर मात्र मच्छिंद्री झाली, असे समजून महापुराचा धोका उंबरठ्यापर्यंत आल्याचे कोल्हापूरकर समजतात. त्यामुळेच कोल्हापुरात पाऊस अधिक झाला तरीही जो पर्यत मच्छिंद्री होत नाही तोपर्यंत स्थलांतर, मदत कार्याची व्याप्ती वाढत नाही. 
आज सकाळी अकराच्या सुमारास ही पातळी सव्वा फुटाने कमी होती, मात्र दुपारी साडेतीनच्या दरम्यान मच्छिंद्र झाली आणि कोल्हापुरात महापूर आल्याचे स्पष्ट झाले.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT