Datta temple of Nrusinhwadi under water 
कोल्हापूर

Video - कोल्हापूर : कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ; नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली 

जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी -दोन दिवस पडलेल्या सततच्या पडणार्‍या पावसामुळे आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे औरवाड नृसिंहवाडीचा जुना पूल पाण्याखाली गेला असून दत्त मंदिराचा 90 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती नारायणस्वामीच्या मंदिरात प्रतिष्ठापीत करण्यात आली आहे. या ठिकाणी सेवेकरी यांच्या मार्फत दिवसभरातील सेवा केली जात आहे. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. राधानगरी चांदोली धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे दोन दिवसात पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटाहून अधिक वाढली आहे. त्याच बरोबर दोन दिवसांमध्ये कृष्णा नदीची पाणीपातळीही वाढल्यामुळे नूसिहवाडी औरवाड जुन्या पुलावर सध्या सहा फूट पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद आहे. 

 नवीन पुलावर पुराची पातळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान काल रात्री साडेअकरा वाजता या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा दत्त मंदिरात संपन्न झाला असला तरी तो पूर्णपणे भाविकांशिवाय रात्री पार पडला. 

कृष्णा आणि पंचगंगा नदी पात्रात वाढ झाल्याने नूसिहवाडी कुरुंदवाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्याखाली बुडाल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. वाढत्या पुराच्या पाण्यामुळे परिसरात गतवर्षीच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या होत आहे.
    

संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT