कोल्हापूर

शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले ; एकाच महिन्यात 1511 जण मयत 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : कोरोनाचे संक्रमण, मधुमेह, रक्तदाब यासह इतर जुन्या जर्जर आजारांनी त्रस्त असलेल्या अनेकांनी ऑगस्टमध्ये प्राण गमावले. शहरातील पंचगंगा स्मशानभूमीसह विविध स्मशानभूमी तसेच मुस्लिम, ख्रिश्‍चन दफनभूमीतून मिळालेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे. एका महिन्यात दहन आणि दफन अशा सुमारे 1511 लोकांचा बळी गेला आहे. यात कोरानाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जवळपास निम्मी आहे. 773 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 
कोल्हापूर शहरात जिल्हा सरकारी रुग्णालयासह विविध प्रकारची खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयातून उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जुलैपासून कोरोनाचा समूह संसर्ग वाढला आहे.यात अनेकांचा बळी गेला आहे. कोरानाने सर्वच यंत्रणेवर ताण पडला आहे. अगदी कोरोना तपासणीपासून ते उपचारापर्यत आणि उपचारापासून ते मृत्यूनंतर कराव्या लागणाऱ्या अंत्यसंस्कारापर्यंत सगळीकडेच वेटिंग आणि मनस्ताप रुग्णांच्या नातेवाईंकांना सहन करावा लागतोहे. विशेषत: जे रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यांना व्हिेंटलेटरच आवश्‍यकता असते पण व्हेंटिलेटरची संख्या कमी आणि रूग्णांची संख्या जास्त यामुळे बऱ्याच जणांचा मृत्यू होत आहे. उपाययोजना केल्याचा आव प्रशासनाकडून आणला जात असला तरी प्रत्यक्षात ही सर्व यंत्रणा रामभरोसे आहे. हे वास्तव आहे. पैसे असणाऱ्या श्रीमंत लोकांनाही पैसे असूनही उपचारापासून वंचितच राहावे लागत आहे. गोरगरीब जनतेची दुर्दशा काय आणि कशी असेल? हे सांगण्याची गरज नाही. 
शहरात मृत्यूचे हे प्रमाण नेहमीपेक्षा तिप्पत आणि चौप्पट आहे. एरवी वर्षाला तीन ते चार हजार मृतदेह पंचंगगा स्मशानभूमी येथे दहन केले जातात. पण ऑगस्टमध्ये हा आकडा पंधराशेंवर गेला आहे. 

ऑगस्टमधील अंत्यसंस्कार असे : 
* पंचगंगा स्मशानभूमी एकूण मृतदेह : 979 
*कोरोना मृतदेह शहरातील - 376 
*कोरोना मृतदेह जिल्हा : 336 
*अन्य मृतदेह : 258 

.......... 
*कसबा बावडा स्मशानभूमी : 185 
*कदमवाडी स्मशानभूमी : 181 
*बापट कॅम्प स्मशानभूमी : 59 
............................. 
एकूण दहन मृतदेह : 1395 

......... 
*मुस्लिम दफनभूमी 
*एकूण मृतदेह दफन : 110 
*कोरोना मृत : 60 
*नॉन कोरोना मृत : 50 
---------------- 
ख्रिस्ती दफनभूमी 
* एकूण मृतदेह दफन : 6 
*कोरोना मृत : 1 
*नॉन कोरोना : 5 
........ 
* सर्व धर्मिय मृतदेह अंत्यविधी संख्या : 1511 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT