jotiba tempal
jotiba tempal  Esakal
कोल्हापूर

जोतिबा खेट्याला 20 पासून सुरुवात; जाणून घ्या, कोल्हापूर अन् खेट्यांची परंपरा

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (Jotiba Temple) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या खेट्यांना येत्या २० तारखेपासून प्रारंभ होत आहे. यासाठी जोतिबा नगरी सज्ज झाली असून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील डागडुजी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा स्वच्छता तसेच मुबलक पाणी देण्याची सोय केली आहे.

जोतिबाच्या खेट्यासाठी राज्यभरातून लाखों भाविक दरवर्षी येतात. माघ महिन्यात जोतिबा देवाचे पाच खेटे घातले जातात. या खेट्यांच्या निमिताने मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्योतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्या पासून प्रारंभ होतो. कोल्हापूरातील पंचगंगा नदी काठी आंघोळ करून कोल्हापूरकर जोतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करतात आणि डोंगराच्या दिशेने चालू लागतात. डोंगरासभोवती असणाऱ्या जोतिबा देवाच्या डोंगर वाटाही गर्दीने फुलून जातात आणि ज्योतिबा डोंगर दुमदूमून जातो. कोल्हापूर आणि खेटे ही परंपर नेमकी काय आहे हे जाणून घेऊया.

कोल्हापूरकर आणि खेटयांची परंपरा

खेट्याच्या दिवशी अख्ख कोल्हापूर जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येते. पहाटे अंधारात हातात बॅटरी घेऊन ते अनवाणी पायांनी डोंगरावर दर्शनासाठी येतात. पूर्वीपासून खेट्यांची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे. अगदी न चुकता कोल्हापूरकर खेट्यांसाठी आवर्जून येतात. खेट्याच्या एखादा रविवारी पूजाऱ्याच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य करून पुरणपोळी व यळवणीच्या आमटीचा आस्वाद घेतात.

दर्शन आणि व्यायाम

दर रविवारी कुशिरे गावातून आपली वाहने लावून कुशिरे ते जोतिबा डोंगर या पायवाटेने कोल्हापूरकर जातात. अगदी पाचशे कोल्हापूरकर भाविक नित्यनेमानं दर रविवारी डोंगरावर येतातच. निदान देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने आठवड्यातून एकदा तरी व्यायाम व्हावा या उद्देशाने हे भाविक दर रविवारी ५० ते ६० मिनिटे डोंगर रस्ता चालतात. यामध्ये सामान्य भाविक, उद्योगपती, डॉक्टर, वकील तसेच महिलांचाही समावेश असतो.

खेटे म्हणजे काय ?

ज्योतिबा डोंगरावर पाच रविवारी भरणाऱ्या यात्रेला जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्याच्या रविवारी भाविक अनवाणी पायानेच डोंगर चालतात.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. पाच रविवारी जोतिबाचा डोंगर गर्दीने फुललेले दिसतो. सांगली, सातारा या भागातील भाविक मात्र गायमुख ते जोतिबा या दगडी पायरी मार्गावर आपले खेटे पूर्ण करतात.

जोतिबा डोंगरावर वीस तारखे पासून जोतिबाचे खेटे सुरू होत असून यासाठीची सर्व तयारी सुरु आहे. या दिवशी भाविकांनी कोणतेही गैरवर्तन करू नये.तसेच भाविकांनी पायी येताना डोंगर पेटवणे,आगी लावणे यासारखे प्रकार करू नयेत. गैरवर्तन केल्यास कडक कारवाई करू.

शितलकुमार डोईजड, साहाय्यक पोलीस निरीक्षक ,कोडोली पोलीस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT