कोल्हापूर

महापौर चषकबाबत माहिती घेऊन निर्णय : डॉ. बलकवडे

महापालिकेने स्पर्धेची तयारी दाखविली तरी केएसए त्यास परवानगी देणार का हे ही महत्त्वाचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एखादी स्पर्धा घ्यायची, की नाही त्यासंबंधी कोविड प्रतिबंधात्मक(covid rules) नियम काय आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून(collector office) घेतल्यानंतर महापौर चषक फुटबॉलसंबंधी निर्णय घेता येईल, यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे(comissinor dr. kadambari balkawade) यांनी ‘सकाळ'ला (sakal)सांगितले.

दरम्यान, कोविडमुळे लॉकडाउन(lockdown) झाल्यानंतर महापौर चषक स्पर्धा निम्म्यावर राहिली होती. दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यातील उपांत्य सामना होणे बाकी आहे. प्रॅक्टीस क्लबने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उर्वरित सामने प्रेक्षकाविना खेळवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक व फुटबॉलपटू सचिन पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. प्रेक्षकाविना सामने खेळवा, पण एकदा स्पर्धा सुरू करू, असे पाटील यांचे म्हणणे आहे. कोविडमुळे दोन वर्षापासून फुटबॉलची स्पर्धा(football competition) बंद पडली आहे. फुटबॉल खेळाडूंचे आर्थिक नुकसान(financial loss) झाले आहे.

खेळाडू फुटबॉलकडे पाठ फिरवतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान महापालिकेने स्पर्धेची तयारी दाखविली तरी केएसए त्यास परवानगी देणार का हे ही महत्त्वाचे आहे. यावर्षीच्या केएसएच्या साखळी स्पर्धेलाही सुरवात झालेली नाही. दरवर्षी नोव्हेंबर अखेरीस साखळी स्पर्धेला सुरवात होते. नंतर बाद पद्धतीच्या स्पर्धा होतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात फुटबॉल हंगामाची सांगता होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT