Decision to close all schools in kolhapur district 
कोल्हापूर

...तोपर्यंत शाळा राहणार बंदच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यातील कोरोनाचा प्रदुर्भाव वाढतो आहे. शासनाने 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत करण्यात आला. शिवाजी पार्क येथील विद्याभवन येथे ही बैठक आज झाली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते. यावेळी शासनाचे 15 जून व 24 जून रोजीच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षणवभागाने 15 जूनच्या शासन निर्णयात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबतचा उल्लेख केलेला आहे. शाळा सुरु करण्याबाबत शाळा समित्यांच्या बैठकीत मंजूरी घेऊन स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे सूचित केले आहे. त्यानंतर 24 जूनच्या शासन निर्णयात शिक्षकांच्या उपस्थितीबाबतचा उल्लेख केला आहे. या दोन्ही शासन आदेशामुळे शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच केंद्र शासनाने 30 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविला आहे. यामध्ये शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय नाही. शाळा सुरु करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश नसताना मुख्याध्यापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर शाळा सुरु करणे अडचणीचे आहे.

याबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत एकवाक्‍यता येण्यासाठी शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आभार मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडीटर मिलिंद पांगिरेकर यांनी मानले. 
यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, खासजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, सचिव दत्ता पाटील, शिक्षक नेते दादा लाड, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिवाजी माळकर, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, शिवाजी कोरवी, प्रा.सी.एम.गायकवाड, खजानिस नंदकुमार गाडेकर, संपर्क प्रमुख अशोक हुबळे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि केंद्र शासनाने 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 
- एस.डी.लाड (सभाध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT