decision regarding the contract professors of Shivaji University by the Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar  
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांना 'पुणे' पॅटर्न लागू होणार का...?

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कंत्राटी (हंगामी सहायक) प्राध्यापकांना मुदतवाढ दिली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष बाब म्हणून हा निर्णय काल (ता. 19) घेतला आहे. शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांबाबत तोच निर्णय प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर घेणार का, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विद्यापीठातील 79 कंत्राटी प्राध्यापकांत अस्वस्थता आहे. नॅक मूल्यांकनाच्या तोंडावर सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीतून विद्यापीठाला मानांकन घसरायचे आहे का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. पुणे विद्यापीठातही कंत्राटी प्राध्यापक असून, त्यांना मुदतवाढ दिली. प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर पुणे विद्यापीठाचे पूर्णवेळ कुलगुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसा निर्णय झाला आहे. शिवाजी विद्यापीठातील पूर्णवेळ प्राध्यापकांची संख्या कमी आहे. त्याला कंत्राटी प्राध्यापकांची जोड मिळाल्याने, विभागांतील पडेल ती कामे करण्यात ते कोणतीही कसूर ठेवत नाहीत. जे कंत्राटी प्राध्यापक अधिविभागांत नेटाने काम करत आहेत, त्यांच्याऐवजी सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीला ग्रीन सिग्नल व्यवस्थापन परिषदेतील एक सदस्य आग्रही का राहिली, हे कोडे होऊन बसले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT