Decision of Shiroli Gram Panchayat action against those without masks 
कोल्हापूर

गावभर कोरोनाचा प्रसाद : क्वारंटाईन व्यक्तीवर शिरोली ग्रामपंचायतीची करडी नजर

सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची (कोल्हापूर)  : क्वारंटाईन व्यक्ती फिरताना आढळल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली.
येथील कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या समीप पोचली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत; मात्र त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे गावात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, यांसह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती व पोलिस प्रशासनातर्फे दररोज केली जात आहे.


स्वॅब तपासणीस दिलेल्या व्यक्तीने अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन होणे गरजेचे आहे; मात्र स्वॅब दिलेली व्यक्ती गावभर फिरत असल्याचे चित्र आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीने स्वॅब दिल्याचे समजते, तोपर्यंत त्याने गावभर कोरोनाचा प्रसाद वाटप केलेला असतो. अशा बेफिकीर व्यक्तीमुळे गावातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्ती फिरताना दिसल्यास त्याला ५ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच खवरे यांनी सांगितले.यावेळी उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, उत्तम पाटील, जोतीराम पोर्लेकर आदी उपस्थित होते.

७४ हजार तीनशे रुपये वसूल
गावात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे यांसह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत ग्रामपंचायतीने ७४ हजार तीनशे रुपये वसूल केले आहेत. ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT