the decision taken of kolhapur commissioner kadambari balkawade from today in kolhapur munciple corporation in kolahpur 
कोल्हापूर

कोल्हापुरात आजपासून ‘प्रशासकराज’ ; आयुक्तांकडे असणार सर्वाधिकार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ संपल्याने उद्यापासून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे याचा प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. नवे सभागृह अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत महापालिकेचे सर्वाधिकार प्रशासक म्हणून त्यांच्याकडेच राहतील. यामध्ये अर्थिक अधिकार, सभागृहासह स्थायी व अन्य समित्यांचे अधिकारही त्यांच्याकडे राहणार आहेत.

महापालिकेच्या २०१५ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची(सभागृह) मुदत १५ नोंव्हेंबरला संपुष्टात आली. मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित होते; पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. कायद्याप्रमाणे या सभागृहाला मुदतवाढ देता येत नाही. त्यामुळे निवडणुका होउन नवे सभागृह अस्तित्वात येत नाही तोपर्यंत महापलिकेवर प्रशासकराज राहणार आहे.

आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या कार्यपद्धतीत सभागृह आणि प्रशासक अशी दोन चाके असतात. महत्त्वाचे निर्णय ठरावाद्वारे सभागृह, स्थायी, परिवहन, महिला बालकल्याण समिती आणि शिक्षण समितीने घ्यावयाचे असतात. सभागृहाने घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीत बसतात की नाही? याची खात्री करुन आयुक्तांनी(प्रशासनाने) त्याची अंमलबजाणी प्रशासनाने करायची असते. पन्नास लाखापर्यंतच्या खर्चाचे अधिकार आयुक्तांना असतात. 

पन्नास लाखांपासून ते पाच कोटी रुपयांच्या खर्चाचे अधिकार स्थायी समितीला असतात. त्यापुढील कामांना सभागृहाने मंजूरी देणे आवश्‍यक असते. आता उद्यापासून सर्वच अधिकार प्रशासकांना मिळाले आहे. कोरोनासंदर्भात पदाधिकाऱ्यांची सल्लागार समिती नगरविकास विभागाने प्रशासकपदाची नेमणूक करताना कोरोना महामारीच्या काळासाठी पदाधिकाऱ्यांची सल्लागार समिती नेमण्याचीही सूचना केली आहे.

यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह इतरांचा समावेश आहे. कोरोना महामारीचा फैलाव आणि प्रसार रोखण्याचे हे काम पदाधिकारी आणि प्रशासन या दोघांनी मिळून करायचे. कोरोना महामारीच्या काळात पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करायचे आहे, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT