Decline of Belgaum Educational District in ssc result
Decline of Belgaum Educational District in ssc result 
कोल्हापूर

दहावीच्या निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्हाची घसरण

मिलिंद देसाई

बेळगाव - दहावी निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची यंदा मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्या राज्यात 31 व्या क्रमांकावर घसरला आहे. तर दरवर्षी पहिल्या 5 क्रमाकांत येणाऱ्या चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचा निकालही कमी लागला असून चिक्कोडीचा राज्यात 30 क्रमांक आला आहे. 

शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी कोरोनाचे संकट असल्याने निकाल कसा लागणार याची चिंता विद्यार्थी व पालकांना लागली होती. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तर काहींना अनुत्तीर्ण झाल्याचे दु:ख लपविता आले नाही. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 124 परीक्षा केंद्रांवर शैक्षणिक जिल्हातील 33180 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र यावेळी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असुनक गतवर्षीच्या तुलनेत बेळगाव शैक्षणिक जिल्हाची 8 क्रमांकाने घसरण झाली आहे. गेल्या वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हा राज्यात 23 व्या क्रमांकावर होता. यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ग्रामीण भागातल विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे अनुत्तीर्णांचे प्रमाण अधिक आहे. 

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा

मार्चमध्ये होणारी दहावीची परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडल्याने तसेच यावेळी निकालासाठी नविन पध्दतीचा उपयोग करण्यात आल्यानेही निकाल कमी लागला आहे. मत शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले आहे. शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केल्यानंतर मंगळवारी सर्व महाविद्यालयांमध्ये निकाल लावला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी करू नये असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण खात्याने दिली आहे.

संपादन - मतीन शेख

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT