Decline In Soybean Yield In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News
Decline In Soybean Yield In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज तालुक्‍यात सोयाबीनच्या उताऱ्यात घसरण

अवधूत पाटील

गडहिंग्लज : उसानंतर चांगले उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. पण, यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात घसरण आली आहे. एकरी दोन ते तीन क्विंटलची घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. वाढीच्या काळात गरजेपेक्षा अधिकचा पाऊस आणि त्यात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

शेतकऱ्यांचा नगदी पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उसाला प्राधान्य दिले जाते. त्याखालोखाल सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. गडहिंग्लज तालुक्‍याचा विचार केला, तर सुमारे 14 हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. तुलनेत पूर्व भागात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. 

सोयाबीनच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. पण, यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात घट आल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे एकरी 12 ते 14 क्विंटल सोयाबीन होते. यंदा त्यामध्ये दोन ते तीन क्विंटलची घट झाली आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात ती अधिक जाणवत आहे. त्या तुलनेत पूर्व भागात उताऱ्यातील घट कमी आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच दरम्यान पाऊस असल्याने शेतकऱ्यांना औषध फवारणीही करणे शक्‍य झाले नाही. याचा परिणाम सोयाबिनवर झालेला दिसून येत आहे. 

आधीच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यात चांगले उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनचेही उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबिनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांची बरीचशी आर्थिक गणिते अवलंबून असतात. पण, आता उत्पन्नातच घट आल्याने ही गणिते सोडविणे अडचणीचे ठरणार आहे. 

काढणीत पावसाचा अडथळा... 
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या तीन-चार दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. नेमकी सोयाबीनची काढणी आणि पावसाची हजेरी एकाच वेळी आली आहे. काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकात पाणी तुंबले आहे. त्यामुळे आलेले पीक घरात घ्यायचे कसे असा प्रश्‍न बळीराजासमोर उभा राहिला आहे. उघडीप मिळेल तशी काढणी व मळणीची कामे करावी लागत आहेत. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT