delta plus esakal
कोल्हापूर

कोल्हापूरच्या चिंतेत भर; जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

हे रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. (kolhapur covid-19) त्यामुळे कोल्हापुरकरांना दिलासा मिळाला होता. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूंचे एकूण सहा रुग्ण सापडले. (kolhapur district delta plus) त्यापैकी कोल्हापूर शहरात 3, हातकणंगलेमध्ये 2 आणि निगवे दुमाला येथे 1 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात सापडलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण विचारेमाळ येथील असून दोन रुग्ण सानेगुरुजी वसाहतींतील आहेत. (kolhapur update)

जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले आहे. हे रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.

प्रयोग शाळेतील सर्व्हेमधून दर महिन्यात 100 सॅंपल दिल्ली येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले जातात. त्यातीलच हे डेल्टाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. मात्र हे सर्व रुग्ण बरे आहेत. .

- डॉ. योगेश साळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT