कोल्हापूर

कोल्हापुरात आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण

संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या यंत्रणेला सूचना

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात (kolhpaur city) डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात यंत्रणा गतिमान केली असून, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधत उपाययोजना करण्याचे तसेच संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

शहराच्या पश्चिमेकडे उपनगरातील एका महिला रुग्णाला डेल्टा प्लसची (delta plus) लागण असल्याचा अहवाल महापालिकेला आज मिळाला. संबंधित महिला २६ मेस कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) होती; पण या महिलेला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे आज उघडकीस आले. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. रमेश जाधव, डॉ. अमोल माने यांच्यासह अन्य आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन पाहणी केली. या संदर्भाने त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले आहे.

यांची आता होणार फेरतपासणी

लशीचे दोन डोस घेऊनही ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली, ज्या रुग्णांना बरे होण्यासाठी जास्तीचा कालावधी लागला, अशा सर्व रुग्णांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचा कोणता विषाणू आढळून आला, याचीही आता फेरतपासणी केली जाईल.

आरोग्य विभागाची तातडीची बैठक

महापालिका प्रशासक डॉ. बलकवडे यांनीही आज सायंकाळी आरोग्य विभागाची बैठक घेऊन या संदर्भाने अनेक सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाची यंत्रणाही गतिमान झाली. आता कोरोना डेल्टा प्लसच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासक बलकवडे यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT