Demand To CEOs To Solve The Problems Of Chandgad Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

साहेब, चंदगडकडे लक्ष द्या ! पदाधिकाऱ्यांचे साकडे

सुनिल कोंडूसकर

चंदगड : जिल्ह्याच्या एका टोकाला वसलेल्या चंदगड तालुक्‍यात सर्वच प्रशासकीय कार्यालयात रिक्त पदांमुळे कामाचा उरक होत नाही. जनतेच्या प्रचंड तक्रारी आहेत. या दुर्गम तालुक्‍याकडे लक्ष द्या, अशी विनंती येथील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली. कोल्हापूर येथे भेट घेऊन तालुक्‍यातील समस्या मांडल्या. 

जिल्ह्याच्या मुख्यालयापासून चंदगड तालुक्‍याचे अंतर दीडशे किलोमीटर आहे. हा तालुका दुर्गम, डोंगराळ आहे. भौगोलिक क्षेत्रफळही मोठे असल्यामुळे शासकीय यंत्रणेवरच नागरिक अवलंबून असतात. जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन या सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरावी तसेच पंचायत समितीकडील प्रतिनियुक्ता रद्द कराव्या, अशी मागणी केली.

सभापती ऍड. अनंत कांबळे, उपसभापती मनीषा शिवणगेकर, सदस्य बबन देसाई, जगन्नाथ हुलजी, दयानंद काणेकर, नंदिनी पाटील, विठाबाई मुरकुटे, रूपा खांडेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, संतोष जाधव, चंदगड नगरपंचायतीचे उपनगराध्य फिरोज मुल्ला, नगरसेवक झाकीर नाईक, अभिजित गुरबे, विलास पाटील (बसर्गे), राजेंद्र परीट, संजय चंदगडकर, कलीम मदार, अशोक दाणी यांचा शिष्टमंडळात समावेश होता. 

मागण्या अशा... 
- या तालुक्‍याला निलंबित कर्मचाऱ्यांनी पाठवू नये 
- पंचायत समितीची जुनी इमारत नगरपंचायतीला भाडे तत्त्वावर द्यावी 
- सादिलवार अनुदानामध्ये वाढ करावी 
- चंदगड ग्रामपंचायत अस्तित्वात असतानाचा चौदावा वित्त आयोग आता नगरपंचायतीला वापरण्यास मिळावा. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT