Demand In Gadhinglaj To Dismiss The Officer Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जलसंपदाच्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची गडहिंग्लजमध्ये मागणी

अजित माद्याळे

गडहिंग्लज : आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या विरोधात पोलिसांमध्ये खोटी फिर्याद देणाऱ्या जलसंपदाच्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याच्या मागणीसह सरकारला जाग येईपर्यंत धरणग्रस्तांची लढाई सुरूच राहील, असा इशारा जनता दलाचे नेते माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे यांनी आज येथे दिला. 

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांवरील खोटा गुन्हा मागे घ्यावा आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याच्या मागणीसाठी जनता दलासह राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद, श्रमिक मुक्ती दल, आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे आज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिंदे बोलत होते. 

ते म्हणाले, ""धरणाचे काम सुरू होऊन वीस वर्षे उलटली. तरीही धरणग्रस्तांचा संघर्ष अजून संपलेला नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर चर्चा न करताच परस्पर काम सुरू करण्याची दंडूकशाही अधिकाऱ्यांनी अवलंबली. याबाबत चर्चा करण्यास गेलेल्या धरणग्रस्तांना अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने आंदोलन सुरू झाले. त्यावेळी जलसंपदाच्या अधिकाऱ्याने धरणग्रस्तांनी जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. हा धरणग्रस्तांवरील अन्याय आहे. एका दिवसाने ही लढाई संपणारी नाही. सरकारला जाग येईपर्यंत लढावे लागेल. त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करून धरणग्रस्तांवरी गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत.'' 

या वेळी संपत देसाई, अशोक जाधव, बाळेश नाईक, संजय तर्डेकर, सदानंद व्हनबट्टे, शंकर पावले यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा सांगून अधिकाऱ्यांच्या दंडकूशाहीबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी, शशिकांत चोथे, उदय कदम, रमेश मगदूम, सुभाष पाटील, विद्याधर गुरव, शरद पाटील, राजेंद्र पुंडपळ, एस. ए. वडराळे, मानसिंग देस्रा, विशाल गुरव आदींसह धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 

मुश्रीफांनी व्यथा ऐकाव्यात 
शिंदे म्हणाले, ""मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत 11 डिसेंबरला बैठक होणार होती. तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी काम सुरू केले. मुश्रीफ यांनी नियोजित दौरा करून धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घ्याव्यात. अन्यथा धरणाच्या पाण्याचे काय करायचे, याचा निर्णय धरणग्रस्त घेतील. सरकारलाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.'' 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT