Police Station esakal
कोल्हापूर

घरफोड्या आणि गुन्हेगारी वाढीमुळे पोलिस दलाकडून स्वतंत्र पोलिस ठाणे मागणीचा प्रस्ताव

नव्या ठाण्यामुळे भागातील घरफोड्यांसह गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत मिळणार आहे. करवीर, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचा भारही हलका होणार आहे.

राजेश मोरे

कोल्हापूर : शहर उभे-आडवे विस्तारत आहे. उपनगराचा विस्तार तेथील घरफोड्या आणि गुन्हेगारी यांचा आलेख पाहता तेथे नव्याने पोलिस ठाण्याची गरज अधोरेखित झाली आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी माणून रिंगरोडवरील आर.के.नगर, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, फुलेवाडी रिंगरोड आदी परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे मागणीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस दलाकडून तयार होत आहे. नव्या ठाण्यामुळे भागातील घरफोड्यांसह गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत मिळणार आहे. करवीर, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचा भारही हलका होणार आहे.

करवीर, राजारामपुरी, गोकुळ शिरगाव, जुना राजवाडा या ठाण्याच्या हद्दीत शहर परिसरातील मोठा भाग येतो. यात मोरेवाडी, कंदलगाव, पाचगाव, आर.के.नगर, कळंबा आदी भागांचा समावेश आहे. येथील लोकवस्तीही झपाट्याने वाढत आहे. हे भाग शहराचाच एक भाग आहेत. संबंधित पोलिस ठाण्यापासून ते दूर अंतरावरही आहेत. करवीर ठाण्यांची हद्द इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत मोठी आहे. येथील''क्राईम रेट’ही दिवसेंदिवस वाढत आहे. हे करवीर ठाणे शहराच्या मध्यवर्ती असून हद्द दूरवर आहे. येथील मनुष्यबळाचा विचार करता कामाचा ताणआहे. या उलट इस्पूर्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोजकीच गावे आहेत.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा शहरालगतचा विस्तारलेला हा भाग एकत्रित करून त्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी करण्याचा विचार सुरू केला आहे. यासंबंधीचा प्राथमिक प्रस्ताव तयार झाला असून तो मंजुरीसाठी पाठविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नवीन पोलिस ठाण्याला शहराजवळील कळंबा, आर.के.नगर, पाचगाव, मोरेवाडी परिसराचा भाग जोडून करवीर हद्दीतील काही गावे इस्पूर्ली पोलिस ठाण्याला जोडण्याचा विचार सुरू आहे.

करवीर ठाणेही स्थलांतराचा विचार; शैलेश बलकवडे

करवीर पोलिस ठाण्याची हद्द शहरापासून दूरवर पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार देण्यासाठी थेट शहरात यावे लागते. पोलिसांना हद्दीत घडलेल्या घटनास्थळी पोहचण्यासाठी वेळेची मर्यादा येत आहे. त्यामुळे करवीर पोलिस ठाणे हे त्याच गावांत स्थलांतरित करण्याचाही विचार सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

करवीर पोलिस ठाणे स्थिती....

  • अधिकारी - ५

  • कर्मचारी - ७०

  • चौकी - ३

  • आऊट पोस्ट - २

  • बीट - ७

  • गतवर्षीचे गुन्हे - ७५२

करवीर हद्दीची स्थिती

  • गावे - ९६

  • ग्रामपंचायती - ७७

  • महामार्ग - ३

  • साखर कारखाने - २

  • लोकसंख्या अंदाजे - सव्वा तीन लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीत अग्नितांडव, २ महिलांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जणांची सुखरुप सुटका

Kas Plateau Flower Season 2026 Closure : महत्त्वाची बातमी! दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जागतिक वारसा स्थळ 'कास पठार' पर्यटकांसाठी एक महिना आधीच बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

Rain Prediction in Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचे ढग; ९ जिल्ह्यांना पावसाचा अंदाज, उन्हाचा चटका कमी होणार?

Kognoli Toll Plaza Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक वळवणार; प्रवाशांसाठी दिले 'हे' नवे पर्यायी मार्ग, कोगनोळी टोलनाक्यावर काय घडतंय?

SCROLL FOR NEXT