

MK Stalin Rahul Gandhi DMK Skips INDIA Alliance Meeting
esakal
DMK Rahul Gandhi Relations : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, याबाबत निर्णय घेण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने आज (२८ नोव्हेंबर) चेन्नईत खासदारांची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता अण्णा अरिवलयम येथील 'मुरासोली मारन संकुला'तील सभागृहात ही बैठक होणार आहे.