demand for luxury items instead of necessities of life 
कोल्हापूर

कोरोनाच्या काळात 'या' चटकदार किराण्याला डिमांड...

राजेंद्र हजारे

निपाणी - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना रुग्ण असलेल्या भागात दुकानेही बंद तर काही ठिकाणी ती चालू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार शासनाने केला असला तरी 'जीवनावश्यक'ऐवजी चैनीच्या वस्तूंना मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

किराणा दुकानातून प्रामुख्याने झटपट तयार होणारे मसालेदार पदार्थ, चीज, बटर, पास्ता, मसाला, वेफर्स, फरसाना, पाणीपुरीची पुरी, विविध प्रकारची बिस्किटे, इसेन्स, बेकिंग पावडर, चॉकलेट पावडर, टोमॅटो सॉस, रेड चिली, ग्रीन चिली, सोयासॉस, विविध प्रकारचे सूप, नूडल्स पाकिटे, चायनीज मसाले, पावभाजी, सांबार व बिर्याणी मसाला, सरबताच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स, ड्रायफ्रूट्स, जाम, चॉकलेट या चैनीच्या वस्तूनाच मोठी मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने सर्वच होलसेल किराणा दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासन आणि भारतीय विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ॲपची निर्मिती केली आहे. तसेच व्हाट्सॲप आणि मोबाइलवरून नोंदणी करून ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. मात्र  जीवनावश्यकपेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून खाण्यावर लोकांचा भर दिसत आहे.

यांचे दर दुप्पट

लॉकडाउनमुळे सहजासहजी चैनीच्या वस्तू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा वस्तूंची दुप्पट दराने विक्री केली जात आहे. त्यामध्ये बिडी, सिगारेट, तंबाखू ,गुटखा यांचा समावेश आहे. दर दुप्पट असले तरीही नागरिक त्याची खरेदी करताना दिसत आहेत.
 

'ॲपवरून नागरिक जीवनावश्यक वस्तूंसह चैनीच्या वस्तूंची मागणी करीत आहेत. व्हाट्सॲप व मोबाईलच्या माध्यमातूनही जीवनावश्यक वस्तू नोंदणीनंतर दिल्या जात आहेत.'
- अमर उपाध्ये,
 किराणा दुकानदार, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT