demand of reserves 200 acres for IT hub in Kagal five star industrial estate
demand of reserves 200 acres for IT hub in Kagal five star industrial estate 
कोल्हापूर

'कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत आयटी हबसाठी दोनशे एकर जागा राखीव ठेवा'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून मंत्री मुश्रीफ आणि श्री पाटील यांनी या मागणीचे पत्र त्यांना दिले.

दरम्यान; उद्योग उभारण्यासाठी जमिनी मिळूनही उद्योग न उभारल्यामुळे रिकाम्या पडलेल्या जमीनी एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी काही छोट्या उद्योगांना देण्याच्या प्रयत्नात आहेत, याकडेही उद्योगमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 या पत्रात पुढे म्हटले आहे की, कागल- हातकणंगले एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्राचा पूर्ण विकास होत आहे. या औद्योगिक वसाहतीतील शेकडो एकर जमीन विकासकांनी फक्त घेऊन ठेवल्या आहेत. आजतागायत या जमिनींवर नियमाप्रमाणे मुदतीत कोणतेही उद्योग उभारले नाहीत. परंतु सातत्याने त्यांना उद्योग उभारण्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीचे एक तृतीयांश क्षेत्र रिकामे आहे. जर हे उद्योग उभारले असते तर रोजगार प्राप्त झाला असता. बॉम्बे रेयॉन या उद्योगाने आपली जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु; सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन एमआयडीसीकडे देण्याचा आदेश दिला आहे. ही जमीन व उर्वरित विकास न झालेली, अशी एकूण २०० एकर जमीन आयटी हब क्षेत्रासाठी राखून ठेवावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT