Demand For Sweet Potato, But Supply Impossible Due To Rains Kolhapur Marathi News
Demand For Sweet Potato, But Supply Impossible Due To Rains Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

रताळ्याला मागणी, पण पावसामुळे पुरवठा अशक्‍य

सुनील कोंडुसकर

चंदगड : महाराष्ट्रासह दिल्ली, अहमदाबाद, सुरत, म्हैसाणा येथून मागणी असलेल्या चंदगडच्या रताळ्यांच्या काढणीत यावर्षी पावसाने व्यत्यय आणल्याने रताळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उपवासाचा पदार्थ म्हणून त्याला मोठी मागणी आहे. परंतु काढणीच शक्‍य नसल्याने हा हंगाम साधायचा कसा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. 

गेले आठवडाभर पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे रताळी काढणीला ब्रेक लागला. दरवर्षी नवरात्रोत्सवापूर्वी मोठ्या प्रमाणात काढणी पूर्ण व्हायची. यावर्षी हंगाम साधता न आल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने महत्वाचा हंगाम हातचा निघून जातो की, काय अशी धाकधूक आहे.

तालुक्‍याच्या मधल्या पट्यात दक्षिणोत्तर भागात अडकूर पासून ते तुडयेपर्यंत मोठ्या प्रमाणात रताळ्याचे उत्पादन घेतले जाते. लाल मातीतील पारंपरिक वाणाचे हे कंदमुळ चवीला रूचकर असल्याने गडहिंग्लज, बेळगाव, कोल्हापूर, पुणे सारख्या स्थानिक बाजारपेठांबरोबरच महाराष्ट्राबाहेरच्या बाजारपेठेतही त्याला मागणी आहे. त्या-त्या भागातील व्यापारी खास चंदगडला येऊन रताळी खरेदी करून नेतात. यातून आर्थिक उत्पन्न चांगले मिळत असल्याने शेतकरी मोठ्या कष्टाने या पिकाची लागवड करतो. परंतु या वर्षी पावसाने त्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. 

तालुक्‍यात शेकडो एकरावर रताळ्याचे पिक घेतले जाते. त्यातून वार्षिक कोट्यावधी रुपयांचे चलन मिळते. जूनमध्ये लागवड केलेल्या आणि सप्टेंबर अखेरीला काढणीला आलेल्या या पिकातून कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या पिकाची निवड करतो. रताळ्याचे वेल जनावरांना चारा म्हणून घालता येतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. त्याची स्निग्धता वाढत असल्याने दुधाला दरही चांगला मिळतो. रताळ्याचा असा विविधांगी उपयोग असल्याने जाणीवपूर्वक शेतात किमान काही क्षेत्रावर त्याची लागवड केली जाते. 

मोठा आर्थिक फटका
पावसामुळे रताळ्यांच्या वरांब्याचा चिखल झाल्याने नांगरट करता येत नाही. पाऊस थांबला तरी आणखी किमान पाच-सहा दिवस काढणी करणे अशक्‍य आहे. तोपर्यंत नवरात्रोत्सव संपतो. पावसाने रताळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. 
- अशोक हारकारे, रताळी उत्पादक शेतकरी, मजरे कार्वे 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT