Dengue death in Ichalkaranji; Dengue has been spreading for the last few days 
कोल्हापूर

इचलकरंजीत डेंग्यूने दुसरा मृत्यू ; गेले काही दिवस डेंगूचा होतोय फैलाव...

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - शहरातील आणखी एका महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला अलीकडच्या काळात डेंग्यूने शहरातील दुसऱ्या महिलेचा बळी घेतला आहे. आज डेंग्यूने मृत्यू झालेली महिला गाव भागातील राम मंदिर परिसरातील आहे. त्या ठिकाणी पालिकेने तातडीने स्वच्छता व औषध फवारणी बाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

इचलकरंजी शहरात गेले काही दिवस डेंगूने फैलाव केला आहे.अनेक भागात यापूर्वीही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.  त्या ठिकाणी पालिकेने धूर फवारणी, औषध फवारणी त्याचबरोबर पाणी तपासण्याची मोहीम जोरदार पद्धतीने सुरू केले आहे.बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यात ही मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाकीमध्ये डेंगूच्या आळ्या सापडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्या कारखान्यांमध्ये योग्य ते दक्षता घेण्यात आली होती. गाव भागातील राम मंदिर परिसरातील 42 वर्षीय  महिलेने खासगी रुग्णालयात तपासणी केली. त्यावेळी तिचे मोठ्याप्रमाणात प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे तिला उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले होते. कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. आज सकाळी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  दरम्यान या भागात पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य खात्याच्या वतीने तातडीने औषध फवारणी तसेच धूर फवारणी सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व घरातील टाक्यांची तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वी श्रीपाद नगर भागातील एका महिलेचा मृत्यू झाला होता त्या पाठोपाठ गाव भागातील या महिलेचा मृत्यू झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT