कोल्हापूर

गुटखा तस्करांचे  हद्दपार प्रस्ताव बारगळले 

युवराज पाटील


कोल्हापूर : गुटखा तस्करी हा समाजविघातक गुन्हा होऊ शकत नसल्याचे कारण पुढे आल्याने अशा तस्करांवर ठेवलेले हद्दपारीचे प्रस्ताव बारगळले आहेत. तुम्ही तस्करी करत जा, गुन्हा दाखल होईल. जामीन मिळाला की पुन्हा तेच काम करण्यास ही मंडळी मोकळी झाली आहेत. 
सीमाभागातून तस्करीचे प्रमाण इतके वाढले आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सक्रिय असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले. ज्यांची नावे सातत्याने तस्करांच्या यादीत येतात, अशा पाच ते सहा जणांवर हद्दपारीचे प्रस्ताव अन्न, औषध व प्रशासनाने ठेवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दिले, मात्र तस्करीचा गुन्हा समाज विघातक कृत्य होऊ शकत नाही, असा तांत्रिक मुद्दा पुढे आला. 
राज्य शासनाने सुगंधी तंबाखू, गुटखा उत्पादनावर सात वर्षांपूर्वी बंदी घातली. शेजारी राज्यात कारखाने सुरू राहिल्याने गुटख्याची तस्करी कमी झाली नाही. हाकेच्या अंतरावर असलेली, पण परराज्यात असलेल्या भागातून खुलेआम तस्करी सुरू झाली. मध्यंतरी ज्या वाहनातून तस्करी झाली, अशी वाहने जप्त केली गेली. ज्याच्याकडे गुटखा सापडला त्यांचा परवाना रद्द झाला. सातत्याने कारवाई होऊनही पुढे काही होत नसल्याचे ध्यानात येताच टोळी अधिक सक्रिय झाली. खबऱ्याकडून बातमी मिळाल्यास कारवाई होती. नंतर या तस्करांचा उघडपणे वावर होतो. तस्करी करणारे नेमके कोण आहेत? हे अन्न औषध प्रशासनाने हेरले. रेकॉर्डवरील तस्करांसाठीच हद्दपारीचे प्रस्ताव ठेवले गेले. तहसीलदारांतर्फे नोटिसा पाठविल्या जातात. तस्करांवर हद्दपारीची कारवाई झाल्यास किमान त्यातून पुढचा तरी सावध होईल आणि काही प्रमाणात तस्करीला आळा बसेल या हेतूने कार्यवाही ठेवली होती, मात्र तांत्रिक कारणामुळे बारगळले आहेत. 


गुटखा तस्करांना पायबंद बसावा, या हेतूने हद्दपारीचे प्रस्ताव ठेवले होते; मात्र गुन्हा समाजविघातक कृत्य होऊ शकत नाही, असा मुद्दा पुढे आहे. किंबहुना तशा आशयाचा अध्यादेश असल्याने प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. 
- मोहन केंबळकर, सहायक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

पहिल्यांदाच सासू आणि नणंदेसोबत दिसली दीपिका पादुकोण; सासरच्यांसोबतचं वागणं पाहून नेटकरी चकीत

SCROLL FOR NEXT